ढोलगरवाडीच्या सर्पोद्यानाला जागा मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:53+5:302021-08-17T04:29:53+5:30

माणगाव : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे ५५ व्या नागपंचमीच्या कार्यक्रमानिमित्त सत्यशोधक, संस्थापक, सर्पमित्र कै. बाबूराव टक्केकर यांच्या प्रतिमेचे व ...

Dholgarwadi's snake garden should get a place | ढोलगरवाडीच्या सर्पोद्यानाला जागा मिळावी

ढोलगरवाडीच्या सर्पोद्यानाला जागा मिळावी

Next

माणगाव : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे ५५ व्या नागपंचमीच्या कार्यक्रमानिमित्त सत्यशोधक, संस्थापक, सर्पमित्र कै. बाबूराव टक्केकर यांच्या प्रतिमेचे व सर्प प्रतिमेचे पूजन उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. नितीन चौगुले होते. अ‍ॅड. संतोष मळवीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शासन नियमातील तरतुदीला अनुसरून मोजणी करून येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या सत्यशोधक, संस्थापक, सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांच्या स्मृतिदिनापूर्वी या सर्पशाळेला शासनाने प्रशस्त जागा द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. संतोष मळवीकर व संस्था उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी केली आहे.

यावेळी सरपंच सरिता तुपारे, उपसरपंच व्हन्नाप्पा तुपारे, संचालक शिवाजी चौगुले, एन. एन. पाटील, शांता टक्केकर, शिवाजी कोकितकर, धानबा कदम, दिवाकर पाटील, व्ही. आर. पाटील, सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, एन. आर. पाटील, प्रकाश टक्केकर, तानाजी कांबळे, किशोर गोसावी, संदीप टक्केकर, प्रकाश सुभेदार, अश्विनी टक्केकर, अनिल गावडे, इंद्रजित टक्केकर, मारुती बुवा, अर्जुन टक्केकर, संतोष सुभेदार, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्राचार्य एन. जी. यळ्ळूरकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात नागराजाच्या पूजनप्रसंगी डॉ. नितीन चौगुले, संतोष मळवीकर, तानाजी वाघमारे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १६०८२०२१-गड-०७

Web Title: Dholgarwadi's snake garden should get a place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.