आमजाई व्हरवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:42+5:302021-02-08T04:21:42+5:30

अरविंद सखाराम पाटील (वय २८), नाना कृष्णा ढेरे (७०), रामा हरी पाटील (८०), लता बंडोपंत पाटील (६५), शोभा हिंदुराव ...

Dhumakul of stray dog at Amjai Verwade | आमजाई व्हरवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

आमजाई व्हरवडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

Next

अरविंद सखाराम पाटील (वय २८), नाना कृष्णा ढेरे (७०), रामा हरी पाटील (८०), लता बंडोपंत पाटील (६५), शोभा हिंदुराव लिंगडे (४५), शालाबाई ज्ञानू कांबळे (५५), सात्ताप्पा चौगले आवळीकर (५०) आदींना चावा घेत जखमी केले. या सर्वांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले कुत्र्याचा हा अवतार पाहून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद लिंगडे यांनी दिनकर पाटील, उत्तम लिंगडे, राजू पाटील, मयूरेश पाटील ,राजेंद्र चौगले, अक्षय हुजरे, रणजित चव्हाण, रणजित पाटील (गोट्या )आदी तरुणांना बरोबर घेत कुत्र्याला गावातून पहिले हाकलून लावत गावाबाहेर घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे त्यांच्याही अंगावर धाऊन जात होते, मात्र, या तरुणांनी धाडस दाखवत हातात काठ्या घेत कुत्र्याला ठार केले.

Web Title: Dhumakul of stray dog at Amjai Verwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.