मिरजकर तिकटी चौकात दोन गटात धुमश्चक्री

By admin | Published: July 4, 2017 06:28 PM2017-07-04T18:28:37+5:302017-07-04T18:28:37+5:30

चाकु हल्ल्यात एक गंभीर, तिघे किरकोळ जखमी

Dhumashchakri in two groups of Mirajkar Tiki Chowk | मिरजकर तिकटी चौकात दोन गटात धुमश्चक्री

मिरजकर तिकटी चौकात दोन गटात धुमश्चक्री

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : पूर्व वैमनस्यातून मिरजकर तिकटी चौकात दोन तालमीच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. एकमेकाच्या अंगावर दगड भिरकावल्याने गोंधळ उडाला. यावेळी युवा सेनेच्या उपशहर प्रमुखास बेदम मारहाण झाली. मंजित किरण माने (वय २३ रा. खरी कॉर्नर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास घडलेल्या याप्रकाराने नागरिकांत भिती पसरली.

हाणामारीनंतर काही वेळाने मंजित माने व त्याच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी सानेगुरुजी वसाहतीकडे निघालेल्या विरोधी गटाच्या तिघा कार्यकर्त्यांना देवकर पाणंद पेट्रोल पंपासमोर अडवून बेदम मारहाण केली. यावेळी केलेल्या चाकु हल्लयात मयुर सुरज चव्हाण (२०, रा. आझाद गल्ली) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या पाठीत वार केला आहे. त्याचे मित्र आदित्य सुनिल डोंगळे (२०, रा. बालगोपाल तालीम परिसर), ऋषीकेश सुधाकर चव्हाण (२०, रा. दौलतनगर) हे किरकोळ जखमी झाले. या तिघांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. या हल्ल्याची माहिती समजताच चव्हाण याच्या मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली.

अधिक माहिती अशी, शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीमध्ये दि. ३० जून रोजी लग्नसमारंभ होता. रात्रीच्या वेळी वरातीमध्ये शाहू मैदान परिसरातील तरुणांसोबत खरी कॉर्नर येथील तरुणांशी नाचकाम करताना धक्का लागून जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीत मंजित पुढे होता. या दोन्ही गटातील तरुण शिवाजी पेठेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. त्यांच्यात गेल्या दोन दिवसापासून वाद धूमसत होता.

दरम्यान मंजित हा मंगळवारी दूपारी बाराच्या सुमारास युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे यांना भेटण्यासाठी मिरजकर तिकटी चौकात आला. ही माहिती शाहू मैदान परिसरातील तरुणांना समजताच पन्नास ते साठ तरुणांचा जमाव मिरजकर तिकटी चौकात आला. सुर्वे यांच्यासोबत बोलत थांबलेल्या मंजित याला धरुन बेदम मारहाण केली. यावेळी मंजितसह त्याच्या मित्रांनी प्रतिहल्ला केल्याने धुमचक्री उडाली.

प्रसंगावधान ओळखून सुर्वे यांच्यासह दिपक थोरात, संदीप पोवार यांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. संतप्त तरुणांनी परिसरात एकमेकाच्या दिशेने दगड भिरकावत प्रचंड दहशत माजविली. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलीसांना समजताच ते घटनास्थळी आले. यावेळी मारहाण करणारे तरुण पसार झाले. त्यानंतर पोलीसांनी मंजितसह हर्षल सुर्वे यांचेशी विचारपूस करुन तक्रार देण्यास सांगितले. परंतू मंजिद हा तक्रार न देता काही मित्रांना घेवून विरोधी गटाच्या मयुर चव्हाण, आदित्य डोंगळे, ऋषीकेश चव्हाण यांचा पाठलाग करुन मारहाण केली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Dhumashchakri in two groups of Mirajkar Tiki Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.