ध्यानचंद चषक ‘तिरंगा’कड
By admin | Published: November 2, 2014 11:35 PM2014-11-02T23:35:05+5:302014-11-02T23:53:20+5:30
महिला हॉकी स्पर्धा : अंतिम सामन्यात ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळावर माते
कोल्हापूर : जिल्हा महिला हॉकी संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद स्मृती चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळ, नूल (ता. गडहिंग्लज)ने ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ (वडणगे-निगवे)चा २-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आज, रविवारी झालेल्या या सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळ व ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना पूर्वार्धात व उत्तरार्धात अनुक्रमे चार व सहा शॉर्टकॉर्नर मिळूनसुद्धा त्याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिला. अखेर पंचांनी सामन्याचा निकाल पेनल्टी स्ट्रोकवर घेण्याचा निर्णय घेतला. हा सामना पेनल्टी स्ट्रोकवर तिरंगा क्रीडा मंडळाने २-० असा जिंकला. सामन्यात तिरंगाकडून प्रीती माने, अश्विनी कुरळे, कावेरी चव्हाण, तर ज्योतिर्लिंगकडून रोहिणी पाटील, प्राजक्ता किडगावकर, श्वेता हरणे, अलकनंदा बागडे, अंकित शेलार, गौरी शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्षा सुरेखा पाटील व जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे यांच्या हस्ते झाले. यावेळी निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी एस. आर. जाधव, जिल्हा महिला हॉकी संघटनेच्या उपाध्यक्षा कल्पना भोसले, कविता साळोखे, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डी. एस. चव्हाण, क्रीडा अधिकारी उदय पोवार, रमेश चौगुले, मनोहर मांगलेकर, महेश सूर्यवंशी, अमोल थोरवत, हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले, सागर जाधव, सुहास पाटील, आदी उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद स्मृती चषक पटकाविणाऱ्या तिरंगा क्रीडा मंडळाच्या महिला संघासोबत सुरेखा पाटील, विजय साळोखे, एस. आर. जाधव, कल्पना भोसले, कविता साळोखे, प्राचार्य डी. एस. चव्हाण, क्रीडा अधिकारी उदय पोवार, रमेश चौगुले, मनोहर मांगलेकर, महेश सूर्यवंशी, अमोल थोरवत, हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले, सागर जाधव, सुहास पाटील, आदी उपस्थित होते