राजाराम साखर कारखान्यात हुकुमशाही कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:53 AM2020-12-11T04:53:01+5:302020-12-11T04:53:01+5:30
सडोली (खालसा) : छत्रपती राजाराम साखर कारखान्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार चालला असून तो मोडून काढून कारखाना सभासदांच्या मालकीचा ...
सडोली (खालसा) : छत्रपती राजाराम साखर कारखान्यात हुकुमशाही पद्धतीने कारभार चालला असून तो मोडून काढून कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्यासाठी राजाराम साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी गटाला त्याची जागा दाखवा, असे आवाहन नगरसेवक मोहन सालपे यांनी केले. ते वाशी (ता. करवीर) येथे राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते
यावेळी एम. बी. पाटील म्हणाले, वाशी येथील ऊस उत्पादक सभासद कारखान्यास ऊस पुरवठा करतात; परंतु पाणदी करणे व अन्य सुविधा देत असताना वाशी गावावर दुजाभाव केला जातो.
सुरेश पाटील म्हणाले, सतेज पाटील जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. यावेळी कारखान्याचे माजी संचालक माळी, उद्योगपती दत्तात्रय हजारे, लक्ष्मण पुजारी यांच्यासह वाशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.