‘डीडीआर’ त्यावेळी बोर्डात झोपा काढत होते काय ?

By admin | Published: January 29, 2015 12:22 AM2015-01-29T00:22:07+5:302015-01-29T00:33:46+5:30

‘पी. एन.’ : बँकेची चुकीच्या पद्धतीने चौकशी

Did the 'DDR' be sleeping in the board at that time? | ‘डीडीआर’ त्यावेळी बोर्डात झोपा काढत होते काय ?

‘डीडीआर’ त्यावेळी बोर्डात झोपा काढत होते काय ?

Next

कोल्हापूर : आम्ही पैसे खाल्ले नाहीत. काही मंडळींनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले, ते पैसे थकले आहेत. पण सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून आमची बदनामी केलेली आहे. संचालक मंडळात डी.डी.आर. (जिल्हा उपनिबंधक) पदसिद्ध सदस्य होते. मग बेकायदेशीर कर्जमंजुरी होत असताना ते काय झोपा काढत होते काय? असा सवाल कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ज्या संस्थांचे कर्ज थकले आहे, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यातून वसुली करणे गरजेचे होते. ते शक्य न झाल्यास संबंधित संस्थेच्या संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणता येते. यातूनही वसूल झाले नाही तर शासनाकडे मदत घेता येते. मात्र थेट बॅँकेच्या संचालकांकडून रक्कम वसूल करून घेणे योग्य नाही. अबु्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही पी. एन. यांनी सांगितले.

न्यायालयात जाऊ :
व्ही. बी. पाटील
दोषी नसताना काही मंडळी बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विभागीय सहनिबंधकांच्या नोटिसा आल्यानंतर सहकारमंत्र्यांकडे दाद मागू. त्यानंतर न्यायालयातही जाणार असल्याची माहिती बॅँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली. स्वर्गीय एस. आर. पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने नि:स्वार्थीपणे बॅँकेत काम केले, त्या व्यक्तीवरही जबाबदारी निश्चित केली जाते. हे सर्व पाहता चौकशी सदोष आहे. याविरोधात सहकारमंत्र्यांकडे दाद मागणार असून, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. निवडणुकीतून बाजूला व्हावे, यासाठी काही मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Did the 'DDR' be sleeping in the board at that time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.