डिझेल रिक्षांना शहरात ‘प्रवेश बंद’

By admin | Published: June 3, 2014 11:59 PM2014-06-03T23:59:30+5:302014-06-04T00:01:06+5:30

लक्ष्मण दराडे : शहरातील ४८ रिक्षा स्टॉपही रद्द करणार

Diesel rickshaws to 'shut down' | डिझेल रिक्षांना शहरात ‘प्रवेश बंद’

डिझेल रिक्षांना शहरात ‘प्रवेश बंद’

Next

 कोल्हापूर : वाहतुकीस अडथळा करणारे शहरातील १९१ रिक्षा स्टॉपपैकी ४८ रिक्षा स्टॉप रद्द करणे तसेच इचलकरंजी व कोल्हापूर शहरात यापुढे डिझेल रिक्षांना बंदी करण्याबाबचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास सादर करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत होणार असल्याने नागरिक व रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षा स्टॉपसाठी १५ तर सुधारित कार्यक्षेत्रांबाबत आठ दिवसांत आरटीओ कार्यालयाकडे हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. रिक्षा परवान्यांचे सुधारित कार्यक्षेत्र रद्द केलेल्या रिक्षा परवान्यांचे जागी मंजूर झालेल्या नवीन रिक्षांना परवाने देताना त्याचे कार्यक्षेत्रात बदल करण्यात येणार आहे. इचलकरंजी व कोल्हापूर शहरात डिझेल इंधनावर चालणार्‍या सर्व रिक्षांना बंदी घालण्यात येणार आहे. पेट्रोल व एलपीजीवर चालणार्‍या रिक्षांनाच शहरात व्यवसाय करण्याची मुभा असेल. कोल्हापूर शहरातील पत्ता असणार्‍या नव्या रिक्षांना परवान्यापूर्वी पेट्रोल किंवा एलपीजी अशी नोंदणी आवश्यक असेल तर इचलकरंजी शहरातील पाच वर्षांच्या पुढील सर्व रिक्षांना परवान्यावर इंधनाची नोंद आवश्यक असेल. उर्वरित जिल्ह्यातील पत्ता असणार्‍या रिक्षांवर ‘पेट्रोल’, ‘डिझेल’ किंवा ‘एलपीजी’ असा शेरा बंधनकारक करण्यात येणार आहे. हे रिक्षा स्टॉप होणार रद्द संभाजीनगर एस.टी. स्टँड, महालक्ष्मी चौक-ताराबाई रोड, लक्ष्मी-सरस्वती चित्रपटगृह, आर. आर. शेरेटन, रंकाळा टॉवर-ताराबाई रोड, बलभीम बॅँक, कोळेकर तिकटी, भवानी मंडप (आतील), विद्यापीठ हायस्कूल, माळकर तिकटी, महापालिका इंडिया हॉटेल, सीपीआर चौक, महाराणा प्रताप चौक (के.एम.टी. स्टॉप), स्टेट बॅँक ट्रेझरीसमोर, अयोध्या, उषा, प्रभात टॉकीज, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी फ्रेंडस् सर्कल, कोंडा ओळ, व्हीनस कॉर्नर, रेगे तिकटी, मंगळवार पेठेतील दत्त रिक्षा मंडळ, गंगावेश-फुलेवाडी रिक्षा स्टॉप, त्रिमूर्ती कॉलनी, सुबराव गवळी तालीम मंडलिक गल्ली, कळंबा फिल्टर हाऊस, शाहूपुरी रेल्वे फाटक, ताराराणी विद्यापीठ, ताराराणी चौक (कावळा नाका), संगम टॉकीज, हॉटेल इंटरनॅशनल, हॉटेल पर्ल, सीबीएस महालक्ष्मी चेंबर्सजवळ सम्राट हॉटेल, हॉटेल पराग, कदमवाडी, शाहूपुरीतील शामराव विठ्ठल बँक, ताराबाई पार्क पाटबंधारे कार्यालय, हॉटेल सुखसागर, राजारामपुरी १२वी गल्ली, जुनी राजारामपुरी पोलीस चौकी, बागल चौक डॉ. मिरजे हॉस्पिटल, उद्यमनगर श्रमजिवी हॉटेल, पार्वती टॉकीजनजीक बॉम्बे हॉटेल, शुक्रवार पोलीस चौकीजवळ नागराज रिक्षा स्टॉप, रिंग रोड एकता रिक्षा मंडळ, पार्वती टॉकीज मुंबई रिक्षा मंडळ, कसबा बावडा पिंजार गल्ली, राजश्री शाहू रिक्षा मंडळ आदी ४८ रिक्षा स्टॉप रद्द होणार आहेत.

Web Title: Diesel rickshaws to 'shut down'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.