Kolhapur: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर डिझेल टँकरला आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:49 PM2024-06-25T13:49:26+5:302024-06-25T13:49:38+5:30

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक ...

Diesel tanker caught fire on Nrisimhwadi-Kurundwad route Kolhapur | Kolhapur: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर डिझेल टँकरला आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

Kolhapur: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर डिझेल टँकरला आग, ..अन् मोठा अनर्थ टळला

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी: नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आज दुपारी अचानक आग लागली. ग्रामस्थांच्या सतर्कतेने आणि कुरुंदवाड अग्निशामक दलाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदवाड आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करण्यासाठी तारा पेट्रोल पंपाहून (MH04-HD-3739) हा टँकर निघाला होता. मात्र हॉटेल ड्रीम व्हिलेज जवळ आल्यावर टँकरच्या मागील बाजूस टायरीला अचानक आग लागली.

शिवराज जाधव, सुशील बहुलेकर, अमोल पाटोळे, गणेश जाधव, राहुल बरगाले, प्रसाद गतारे आदी ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत धाडसाने वाळू व पाण्याचा फवारा सुरू केला. मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला. दरम्यान, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच आग आटोक्यात आली व मोठा अनर्थ टळला. यावेळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

संबंधित आग लागलेला टँकर हा कुरुंदवाड आगाराच्या डेपोकडे जात होता. मात्र याबाबत आगार प्रमुख नामदेव पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. टँकरमध्ये अग्निरोधक उपकरण नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढा मोठा अनर्थ घडतो मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही व त्याबाबत आगारप्रमुखांना माहिती नसणे, हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सागर मोरबाळे यांनी व्यक्त केली.

Web Title: Diesel tanker caught fire on Nrisimhwadi-Kurundwad route Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.