कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:17 AM2017-10-25T01:17:06+5:302017-10-25T01:19:07+5:30

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या

 Digitized IT department | कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

Next
ठळक मुद्देपोर्टलवरील याद्या गायब :कर्जमाफी लोंबकळण्याची शक्यताबॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या आणि त्यानंतर पोर्टलवरून त्या गायब झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. तालुकास्तरीय समितीचे काम ठप्पच राहिल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या हातात नेमकी कधी पडेल याबाबत संभ्रमावस्था पसरली असून कर्जमाफीचे प्रकरण लोंबकळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदारांना दीड लाखांपर्यंत तर नियमित परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने लेखापरीक्षण करून अपलोड केलेल्या याद्यांतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर जाहीर केली. वास्तविक आयटी विभागाने आयकर परतावा करणारे व सरकार कर्मचाºयांची नावे वगळून पात्र, अपात्र शेतकºयांची नावे जाहीर करायची आहे.

या यादीतून सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांची नावे वगळण्याचे काम तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती केवळ निरीक्षणाचे काम करून विभागीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.
राज्य सरकारच्या आयटी विभागाने १८ आॅक्टोबरला शेतकºयांची अर्धवट नावे प्रसिद्ध केली आणि पुन्हा गोंधळ उडाला. मंगळवारपासून तर ही यादीही पोर्टलवरून गायब झाल्याने सहकार विभागाला काहीच काम करता येईना. पोर्टलवर यादी नसल्याने तालुकास्तरीय समितीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लोंबकळत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंजुरी आधीच जमा-खर्चाने गोंधळ!
सहकार विभागाने जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सोमवारी जमा-खर्च करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते; पण कर्जमाफीच्या निकषांनुसार तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिल्याशिवाय ती रक्कम ग्राह्य मानता येत नाही. बॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सहकार विभागाने या समितीची मान्यता घेतली.

आजपासून चावडी वाचन
ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे थांबलेला चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वास्तविक सोमवारपासून वाचन सुरू होईल, असे सांगण्यात आले पण गेली दोन दिवस संबंधितांना प्रशिक्षणच देण्यात आले. त्यामुळे आज, बुधवारपासून चावडी वाचनास सुरुवात होणार आहे.

Web Title:  Digitized IT department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.