Kolhapur: राधानगरीचं वैभव असणाऱ्या हत्ती महालच्या उरल्या केवळ भिंती, ऐतिहासिक खुणा होतायत नष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 05:07 PM2024-06-18T17:07:52+5:302024-06-18T17:08:34+5:30

राधानगरीला जसे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे, तसा ऐतिहासिक वारसाही

Dilapidated condition of Hatti mahal Vastu which adds to the tourism of Radhanagari kolhapur | Kolhapur: राधानगरीचं वैभव असणाऱ्या हत्ती महालच्या उरल्या केवळ भिंती, ऐतिहासिक खुणा होतायत नष्ट 

Kolhapur: राधानगरीचं वैभव असणाऱ्या हत्ती महालच्या उरल्या केवळ भिंती, ऐतिहासिक खुणा होतायत नष्ट 

गौरव सांगावकर

राधानगरी : राधानगरीच्यापर्यटनात भर टाकणारा हत्तीमहाल आत्ता झाडाझुडपांनी वेढला आहे. मोठमोठ्या झाडांची मुळे, उंच चढलेल्या वेली, मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची पोळी यांमुळे हत्तीमहालाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होत आहेत. 

राधानगरीला जसे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे, तसा ऐतिहासिक वारसाही आहे. धरणाच्या मध्यभागी असणारा 'बेनजर व्हिला,’ असेल किंवा राधानगरीपासून २ कि.मी. अंतरावर असणार हत्तीमहाल, त्यांची आज अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.

पूर्वी हत्तींना बांधण्यासाठी किंवा खेळवण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी १९०८ च्या सुमारास हत्तीमहालाची बांधणी करवून घेतली. या वास्तूत हत्तींच्या निवाऱ्यासाठी स्वतंत्र खोल्या, अशी रचना आहे. प्रत्यक्षात काटकोनात असणारी ही वास्तू तीन मोठ्या कमानींनी जोडली आहे. मध्यभागी मोठी प्रशस्त जागा. दगडी बांधकामात असलेली ही दोनमजली भव्य वास्तू आहे. हत्ती बांधत असलेल्या मोठमोठ्या लोखंडी रिंगा आजही येते पाहावयास मिळतात. 

महालाच्या बाहेरील बाजूस हत्ती खेळण्यासाठी असणारे बुरूज इतिहासजमा झाले आहेत. पर्यटनाची पंढरी म्हणून तालुका नावारूपाला येत असताना दुसरीकडे मात्र ऐतिहासिक ठेवा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटक येथे येतात; पण हत्तीमहालाची माहिती देणारा साधा फलकही येथे नाही. प्रत्येक वेळी नवीन आराखडा तयार केला जातो. 

हत्तीमहाल वास्तूच्या जतन व संवर्धनाचा प्रस्ताव प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून मंजूर झाला. त्यासाठी ६१ लाखांच्या निधीची तरतूद झाली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. पुरातन विभाग तसेच स्थानिक प्रतिनिधींनी आत्ता तरी लक्ष देणे गरजेचे आहे. भग्नावस्थेत असणाऱ्या या वास्तूचा कायापालट होणार कधी, असा प्रश्न पर्यटक व निसर्गप्रेमी विचारत आहेत.

Web Title: Dilapidated condition of Hatti mahal Vastu which adds to the tourism of Radhanagari kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.