दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 07:43 PM2021-03-27T19:43:39+5:302021-03-27T19:48:05+5:30
Wrestling Lokmat Kolhapur- वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरीचा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पंचगंगेला कर्मभूमी माननू कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवतो.. अशा या पैलवान दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी आहे अशा भावना शनिवारी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूर : वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरीचा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पंचगंगेला कर्मभूमी माननू कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवतो.. अशा या पैलवान दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी आहे अशा भावना शनिवारी मान्यवरांनी व्यक्त केल्या. निमित्त होतं दिनानासिंह यांचा आयुष्यपट उलगडणाऱ्या व लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या लाल माती या आत्मरचित्राच्या प्रकाशनाचे.
राजर्षी शाहू स्मारक भवनात मान्यवरांच्या मांदियाळीत व कुस्तीगीरांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, राष्ट्रीय कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील उपस्थित होते. यावेळी
दीड लाखांची मदत
दीड वर्षापूर्वी दिनानाथ सिहं यांच्या उपचारासाठी लोकमतने केोल्या आवाहनानंतर भरघोस निधी मिळाला होता. या कार्यक्रमातही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फौंडेशनच्यावतीने एक लाखांचा निधी जाहीर केला. तर प्रयाग चिखली येथील एस. आर. पाटील व पांडूरंग पाटील यांनी ५० हजारांचा धनादेश दिनानाथसिंह यांना सुपूर्द केला.
हिंदकेसरीच्या मैदानात लोकमतची घोषणा
यावेळी दिनानाथसिंह यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांची आठवण सांगितली. जवाहरलालजी व जांबुवंतराव धोटे हे वारंवार कुस्ती पाहायला यायचे. हिंदकेसरीची अंतिम स्पर्धा पाहायला ते आले होेते. त्यावेळी दोघांनी मिळून मला १हजार दहा रुपये बक्षीस दिले होते. या मैदानात जवाहरलालजी दर्डा यांनी मी लोकमतची स्थापना करत असल्याचे जाहीर केले होते.