दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:10 PM2018-02-19T23:10:26+5:302018-02-19T23:11:57+5:30

 Dindewadi-Barve project stops due to rehabilitation: Will the rest of the work ever be started? | दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

googlenewsNext
ठळक मुद्दे४५ टक्के काम पूर्ण राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा

नामदेव पाटील ।
पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, उर्वरित ०.३२ टीएमसी पाणीसाठा दिंडेवाडी-बारवे प्रकल्पात साठवण्याचे ठरले. या प्रकल्पास ३१ जानेवारी २००० रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सुरुवातीस प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध केला होता. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे गाजर दाखविण्यात आले. देवरा यांच्या आश्वासनानंतर काम सुरू करण्यात आले. सन २००७-०८ या हंगामात ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, तेव्हापासून आजपर्यंत काम बंद आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य इतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद असून आधी पुनर्वसन, मगच धरण अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी घेतली आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे. बुडीत क्षेत्र ८०.११ हेक्टर असून उपसा सिंचनाद्वारे भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, नागनवाडी, पांगिरे तसेच कागल तालुक्यातील मांगनूर, हसूर बु., हसूर खु. या गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून प्रकल्पग्रस्त शेतकºयांना बारवे, दिंडेवाडी, मांगनूर, हसूर बु., हसूर खु., नंद्याळ, अर्जुनवाडा, मेतके, खडकेवाडा, आलाबाद या लाभक्षेत्रातील जमीन उपलब्ध करून देण्याचे आहे. मात्र, कागल तालुक्यातील काही गावांनी जमीन देण्यास नकार देत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम रेंगाळले.

चिकोत्रा खोºयात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अपुरा पाऊस, कमकुवत जलस्रोत यामुळे झुलपेवाडी धरणाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.
 

भुदरगड तालुक्यातील पूर्वेकडील भागाचा पाण्याअभावी विकास खुंटला असून, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प पूर्ण ह़ोेण्यास आपण सकारात्मक आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड व कागल तालुक्यांतील काही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- प्रकाश आबिटकर, आमदार

Web Title:  Dindewadi-Barve project stops due to rehabilitation: Will the rest of the work ever be started?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.