ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:37 PM2019-10-05T14:37:23+5:302019-10-05T14:44:47+5:30
टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी गुरुवारी (दि. ३) वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत येथील प्रशासनाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली.
विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. येथील स्वच्छतागृह आणि परिसराची सोमवार (दि. ७) पासून नियमितपणे स्वच्छता करण्यात येईल. वसतिगृहात स्वयंपाक बनविण्यासाठी आवश्यक भांडी दिली जाणार आहेत. त्याबाबतची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती डॉ. साळी यांनी शुक्रवारी दिली.
अहवाल देण्याची सूचना
विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल सोमवार (दि. ७) पर्यंत देण्याची सूचना वसतिगृहाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिली आहे. या अहवालानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे साळी यांनी सांगितले.