दहा लाख टनांची प्रत्यक्ष निर्यात । ५० लाख टनांचे लक्ष्य गाठणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:36 PM2019-03-09T23:36:32+5:302019-03-09T23:37:31+5:30
देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत.
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. यातील १० लाख टनांहून अधिक साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा जादा साखर झाल्याने निर्यात करून ती कमी करण्यासाठी केंद्राने गेल्या हंगामात २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. तेही गाठता आले नव्हते.
या हंगामातही केंद्राने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य दिले आहे. त्यासाठी कारखानानिहाय निर्यात कोटा ठरवून देण्यातआला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दर २० रुपये प्रतिकिलोच्या आसपासच रेंगाळत आहेत. यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांच्या निर्यात साखरेवर प्रतिटन थेट अनुदानही सरकारने देऊ केले आहेत. ते मिळाल्यांनरही साखर कारखान्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल तोटा येत होता. काही दिवसांपूर्वीच केंद्राने साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये केला आहे. त्यामुळे कारखान्यांचा हा तोटा क्विंटलमागे आणखी २०० रुपयांनी वाढला आहे.
आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार ६ मार्च अखेर कारखान्यांनी २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. १५ लाख ६० हजार ९७७ टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांतून बाहेर पडली असून, त्यातील १० श्रलाख २६ हजार ६७६ टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली श्रआहे. उर्वरित ५ लाख ३४ हजार ३०१ टन साखर एकतर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींजमध्ये आहे.
बांगला देशाला सर्वाधिक निर्यात
बांगला देशाला सर्वाधिक २ लाख ३३ हजार ४२८ टन साखर निर्यात झाली आहे. त्याखालोखाल श्रीलंकेला १ लाख ८४ हजार ४०७ लाख टन निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत हे प्रमाण अनुक्रमे २०.५ टक्के आणि १५. ८४ टक्के इतके आहे. उर्वरित साखर सोमालिया, सुदान, मलेशियासह अन्य देशांना निर्यात झाली आहे.