सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची दिशा आज ठरणार
By admin | Published: November 19, 2016 01:05 AM2016-11-19T01:05:36+5:302016-11-19T01:07:14+5:30
बार असोसिएशनची बैठक : सहा जिल्ह्यांतील वकील बैठकीला उपस्थित राहणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी विविध मार्गाने आंदोलने करण्याचा निर्धार वकील बांधवांनी कोल्हापुरात केला. आज, शनिवारी होणाऱ्या सहा जिल्ह्यांतील बारच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. या बैठकीत वकिलांची मते जाणून घेण्यात आली. पाच जिल्ह्यांतील बैठकीत सर्किट बेंचच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
बैठकीच्या सुरुवातीला सेक्रेटरी अॅड. सर्जेराव खोत यांनी, अवमान याचिका सुनावणी व सर्किट बेंच हे दोन विषय या बैठकीत घेण्यात आले आहे. माजी अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी, कोल्हापूरवगळता उर्वरित जिल्ह्यांतील वकिलांनी यापूर्वीचे उच्च न्यायालयाला अंडर टेकिंग दिलेले आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीतच चर्चा करून सर्वांनुमते निर्णय घ्यावा, असे सुचविले. माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी, सरकारला जाग आणण्यासाठी रोज शांततेच्या मार्गाने पाच वकिलांचे साखळी उपोषण न्यायालयाच्या दारात करावे. त्यानंतर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण व महामार्ग रोकोसारखे आंदोलन करावीत, अशी सूचना केली.
अॅड. कोमल राणे , माजी अध्यक्ष अॅड. अजित मोहिते यांचे भाषण झाले. बैठकीस माजी अध्यक्ष अॅड. शिवाजी राणे, अॅड. शिवराम जोशी, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. पिराजी भावके, जॉर्इंट सेक्रेटरी अॅड. अंशुमन कोरे, लोकल आॅडिटर अॅड. प्रशांत पाटील, अॅड. यतिन कापडिया, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले.
————-
==================
फोटो : १८११२०१६-कोल-बार असोसिएशन
=======================