दिशादर्शक फलकच बनला अपघाताचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:31+5:302021-04-11T04:23:31+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशवाडी - शेडशाळ मार्गावर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे गेल्या दोन दिवसांत दोन अपघात झाले आहेत. या अपघातात ...

The directional sign became the cause of the accident | दिशादर्शक फलकच बनला अपघाताचे कारण

दिशादर्शक फलकच बनला अपघाताचे कारण

Next

सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशवाडी - शेडशाळ मार्गावर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे गेल्या दोन दिवसांत दोन अपघात झाले आहेत. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एखाद्याचा अपघातात बळी गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशवाडी - शेडशाळ मार्गावर लावलेल्या दिशादर्शक फलकामुळे गुरुवार आणि शुक्रवारी लागोपाठ दोन दिवस अपघात झालेत. दिशादर्शक फलक रस्त्यावर असल्याने फलक चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचे अपघात होत आहेत. चुकीच्या ठिकाणी दिशादर्शक बसवल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे.

फोटो ओळ - : सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशवाडी - शेडशाळ मार्गावर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे गेल्या दोन दिवसांत झालेले अपघात.

( छाया : रमेश सुतार, बुबनाळ )

Web Title: The directional sign became the cause of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.