ग्रामपंचायतीकडून अपंग निधीचे वाटप नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:15+5:302021-05-06T04:26:15+5:30
शासनाने अपंग बांधवांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी खर्च करावयाचा असा आदेश असताना तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी मनमानीपणे ३१ ...
शासनाने अपंग बांधवांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी खर्च करावयाचा असा आदेश असताना तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी मनमानीपणे ३१ मार्चपूर्वी अपंग निधी लाभार्थींना वितरित केलेला नाही. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी निधी खर्च केलेला नाही. पंचायत समितीने वेळोवेळी ग्रामपंचायतींना नोटीस काढून अपंग निधी लाभार्थींना वितरित करण्याचा आदेश देऊन ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. निधी खर्च झाल्याचा खोटा अहवाल पंचायत समितीला काही ग्रामसेवकांनी दिला आहे. सभापती विजय खोत यांनी पिशवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पिशवी गावातील अपंग लाभार्थींनी पंचायत समितीकडे अपंग निधी वितरित न केल्याची तक्रार अर्ज दाखल केला आहे. मनमानीपणे अपंगांचा पाच टक्के निधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्याची मागणी आस्था अपंग संस्थेने निवेदनाद्वारे केली आहे.