पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती

By अतुल कुलकर्णी | Published: August 13, 2019 05:07 AM2019-08-13T05:07:04+5:302019-08-13T05:16:14+5:30

कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा आणि पवना यासह राज्यातील अनेक नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रामध्ये ४० ते ५० टक्के अतिक्रमणे झाली आहेत.

Disaster in Kolhapur & Sangli due to encroachment in flood-prone areas | पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती

पूरप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांमुळेच कोल्हापूर, सांगलीत महापुराची आपत्ती

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी

मुंबई : कृष्णा, पंचगंगा, मुळा, मुठा आणि पवना यासह राज्यातील अनेक नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रामध्ये ४० ते ५० टक्के अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी नद्यांचे पात्र अंकुचित झाल्याने पाणी वाहून जाण्यात अडथळे तयार झाले. हीच परिस्थिती सांगली, सातारा व कोल्हापूरमध्ये असल्याने गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व नद्यांच्या पात्रांमधे असणाऱ्या ब्ल्यू लाईनकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आणि धरणांच्या पाणी सोडण्याचे नियोजन करण्याकडे कार्यकारी अभियंत्यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष या विनाशाला कारणीभूत ठरले आहे.

२५ वर्षांत सर्वाधिक पाऊस ज्या पातळीपर्यंत येतो त्याला ‘ब्ल्यू लाईन’ म्हणतात आणि १०० वर्षांत एकदा आलेला सर्वात जास्त जाऊस ज्या पातळीपर्यंत येतो त्याला ‘रेड लाईन’ म्हणतात. ही लाईन आखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असते. २००५ साली जेव्हा पूर आला; त्यावेळी ब्ल्यू लाईन निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात या नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली. बिल्डर आणि वाळू माफियांनी नदीचे पात्रच बदलून टाकले. ब्ल्यू लाईनमध्ये बदल न करू देणाºया अधिकाºयांना बदलीला सामोरे जावे लागले. या भागाची जबाबदारी ज्या खलील अन्सारी या कार्यकारी संचालकांकडे होती त्यांनी देखील ब्ल्यू लाईनकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. परिणामी अन्सारी यांचेच स्वत:चे कोल्हापूरातील घर देखील पाण्यात गेले.

नदीपात्रांमध्ये अतिक्रमण होऊ नये याची जबाबदारी पालिका, महापालिका आणि नगरविकास विभागाची असते. मात्र सर्वांनीच अतिक्रमणांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. याची प्रचंड मोठी किंमत या तीन जिल्ह्यांच्या जनतेला द्यावी लागली.

रितेश देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्री निधीस २५ लाख
अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांची मदत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हा निधी वापरावा, अशी इच्छा देशमुख दाम्पत्याने व्यक्त केली.

पंचगंगा खोºयातील प्रत्यक्ष निरीक्षणानुसार साधारणपणे १००० क्युसेक्स विसर्ग वाढल्यास पाणी पातळी १ फुटाने वाढते.
2019 सालचा महत्तम विसर्ग हा २००५ च्या महत्तम विसर्गापेक्षा ७०२४ क्युसेक्सनी जास्त होता. त्यामुळे २०१९ ची पुरपातळी ही ५५ फूट ७ इंच म्हणजे २००५ च्या तुलनेत ६ फूट १ इंचाने जास्त झाली.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाची अनिश्चितता कायम राहणार आहे. राज्यातील सगळ्या नद्यांच्या ब्ल्यू व रेड लाईनचा पुन्हा नव्याने आढावा घेऊन या भागात येणारी अतिक्रमणे कायदा करून दूर केली तरच लोकांचे, जनावरांचे जीव वाचतील अन्यथा हाती काहीही उरणार नाही, अशी संतप्त भावना पर्यावरणरक्षक व्यक्त करत आहेत.

2005
पुराच्या आधी ४ दिवसांचे पंचगंगा खोºयातील सरकारी पर्जन्यमान २१४ मी.मी. व कोयना खोºयातील २५२ मी.मी. एवढे होते.
कोल्हापूर येथील राजाराम बंधाºयाचा महत्तम विसर्ग ६७,५८५ क्यूसेक्स व महत्तम पूरपातळी २७ जुलै २००५ रोजी ४९ फूट ६ इंच होती.

2019
पुराच्या आधी ४ दिवसांचे पंचगंगा खोºयातील सरकारी पर्जन्यमान ३४९ मि.मी. व कोयना खोºयातील २९० मी.मी. एवढे होते.
कोल्हापूर येथील राजाराम बंधाºयाचा महत्तम विसर्ग ७४,६०९ क्यूसेक्स व महत्तम पूर पातळी ७ आॅगस्ट २०१९ रोजी ५५ फूट ७ इंच होती.

Web Title: Disaster in Kolhapur & Sangli due to encroachment in flood-prone areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.