इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:30+5:302021-07-23T04:16:30+5:30

कोल्हापूर : इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची गुरुवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये संभाव्य ...

Disaster Management Squad of Indian Red Cross Society ready | इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

googlenewsNext

कोल्हापूर : इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर जिल्हा शाखेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची गुरुवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजनांच्या नियोजनाबाबत चर्चा करून आपत्ती व्यवस्थापन पथक (टीम) सज्ज करण्यात आली. संस्थेकडे लाईफ जॅकेट उपलब्ध असून लवकरच पूरग्रस्त भागांमध्ये त्याचे वाटप केले जाणार आहे.

पुराच्या पाण्यात अडकणे, साप घरात येणे, पाण्यामुळे पडझड होणे, अशा तक्रारी या काळात येण्याची शक्यता असल्याने या मदत कार्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे नियोजन करण्यात आले. पूरग्रस्त परिसरातील रहिवाशांची संख्या आणि मदतकार्य याबाबत चर्चा करण्यात आली. सन २०१९ मध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुरावेळी सर्वात पहिली बचावकार्य मोहीम इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे हाती घेण्यात आली होती. न्यू पॅलेस परिसरातील शेकडो नागरिकांना रात्रीच्या अंधारात रेड क्रॉस आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले होते. सध्या सुरू असलेली पावसाची संततधार आणि वाढणारी पाण्याची पातळी यामुळे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने मदतकार्य मोहीम करण्याबाबत नियोजन करण्यात आले. या वेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमरदीप पाटील, निरंजन वायचळ, शैलेश देशपांडे, ऋषिकेश केसकर, विनोद कांबोज, शिवप्रसाद रायबागकर, मनीष देशपांडे उपस्थित होते.

चौकट

मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

अमरदीप पाटील (९८२३०५००४०), निरंजन वायचळ (९४२३०४१४०९), शैलेश देशपांडे (९९२३२०७३८४), ऋषिकेश केसकर (७५८८५९४०७०), विनोद कांबोज (९४२२०४४१०७), मनीष देशपांडे (९४२२६२२७०१).

चौकट

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन टप्पे

सर्वसाधारणपणे आपत्ती व्यवस्थापनाचे तीन टप्पे ठरविले आहेत. त्यात आपत्ती परिसीमन, आपत्ती प्रतिसाद, मदतकार्यः पुनर्वसन आणि पुनर्विकासचा समावेश आहे. यातील आपत्ती प्रतिसादासाठी रेड क्रॉस सोसायटीने जगभरात स्वतंत्र पथक तयार केले आहे.

Web Title: Disaster Management Squad of Indian Red Cross Society ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.