आपत्तीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:27+5:302021-09-03T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील फुटलेल्या तलावामुळे मेघोली, तळकरवाडी, सोनुर्ली, नवले, वेंगरुळ परिसरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क : गारगोटी : मेघोली (ता. भुदरगड) येथील फुटलेल्या तलावामुळे मेघोली, तळकरवाडी, सोनुर्ली, नवले, वेंगरुळ परिसरातील शेती, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नवले येथील निवृत्ती मोहिते यांची ५ जनावरे पुरात मृत झाली असून, धनाजी मोहिते यांच्या पत्नी पुरात वाहून गेल्या आहेत. या सर्व परिस्थितीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. या धरणफुटीस जबाबदार असणाऱ्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील आणी भाजयुमोचे प्रदेश सचिव कांदळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई, सुनील तेली, भगवान शिंदे, भाजप शहराध्यक्ष राहुल चौगले, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील, रणजित आडके, रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो मेलवर दिला आहे
०२ भाजप गारगोटी