रांगोळी सरपंचावरील अविश्वास नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:16+5:302020-12-31T04:26:16+5:30
सरपंच भोसले इतर सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करतात या कारणावरून १४ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. ...
सरपंच भोसले इतर सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करतात या कारणावरून १४ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. लोकनियुक्त सरपंच यांच्यावरील अविश्वास ठरावाला मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेची संमती लागते. १४ ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध सरपंच अशा सुरू असणाऱ्या या सामन्याचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ५२३७ एकूण मतदानापैकी २१३५ मतदारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २०५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८१ मते अवैध ठरली. १९७२ वैध मतांपैकी अविश्वास ठरावाच्या विरोधात ११०४ मते, तर ठरावाच्या बाजूने ८६८ मते मिळाली. त्यामुळे २३६ मतांनी सरपंच भोसले यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले.