अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकावे : एआयएसएफची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:20 PM2019-07-11T12:20:23+5:302019-07-11T12:21:41+5:30

नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

 Discard the Sangh issue from the syllabus: AISF demand | अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकावे : एआयएसएफची मागणी

 नागपूर विद्यापीठाविरोधात आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

Next
ठळक मुद्दे अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकावे एआयएसएफची मागणी

कोल्हापूर : नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

फेडरेशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजप सरकारचा शिक्षणाचे धार्मिकीकरण आणि खाजगीकरण करण्यावर जोर आहे. देश स्वातंत्र्याच्या लढ्यात कम्युनिस्टांचे मोलाचे योगदान होते. उलट संघाचे नेते क्रांतिकारकांना पकडून देण्यात आघाडीवर होते.

स्वातंत्र्यानंतर आरएसएस आणि हिंदू महासभेने ‘काळा दिन’ पाळला होता. अजूनही संघ आपल्या कार्यालयावर देशाचा झेंडा फडकवत नाही; मात्र देशविरोधी कार्य करणाऱ्या व महात्मा गांधींच्या हत्येशी संबंध असलेल्या या संघटनेच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला आहे.

बी. ए. अभ्यासक्रमात ‘संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षणाचे संघीकरण करण्याचे षङयंत्र आहे. यानंतर मनुस्मृतीदेखील विद्यापीठात आदर्श रचना म्हणून शिकविण्याचे दिवस दूर नाहीत, तरी अभ्यासक्रमातील संघाचा आशय व पुस्तक मागे घेण्यात यावे, अन्यथा देशभर नागपूर विद्यापीठ व सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, धीरज कठारे, योगेश कसबे, सुनील कोळी उपस्थित होते.

 

 

Web Title:  Discard the Sangh issue from the syllabus: AISF demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.