'हिडकल'मधून १००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:26 PM2020-08-10T14:26:44+5:302020-08-10T14:28:36+5:30

बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे.

Discharge of 1000 cusecs of water from 'Hidkal' ..! | 'हिडकल'मधून १००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग..!

बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील पाणी उजव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे.

Next
ठळक मुद्देआमदार राजेश पाटील यांचे प्रयत्न चंदगड, गडहिंग्लजची पूरपरिस्थिती नियंत्रणात येणार

गडहिंग्लज : बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात चंदगड तालुक्यातील कोवाड आणि गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी परिसराला हिडकलच्या पाण्यामुळेच महापूराचा फटका बसतो, त्यामुळे 'हिडकल'चे पाणी सोडण्यात यावे, अशी जनतेची मागणी होती.

यासंर्भात आमदार राजेश पाटील यांनी कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे घटप्रभा खो-यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन्ही नद्यांच्या पूराचे पाणी सामावून घेण्यासाठी हिडकल धरणात
जागा उपलब्ध होणार आहे.

यावेळी हिडकल धरणाचे अधिकारी माडीवाले, गडहिंग्लज पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बाबुराव पाटोळे व शाखाधिकारी तुषार पवार उपस्थित होते.


 

Web Title: Discharge of 1000 cusecs of water from 'Hidkal' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.