आलमट्टीतून २ लाख क्युसेकचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:21 PM2020-08-16T22:21:07+5:302020-08-16T22:26:35+5:30
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवत २ लाख क्युसेक इतका केला आहे.
ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र -यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात चर्चाआलमट्टीतून २ लाख क्युसेकचा विसर्ग
कोल्हापूर- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली.
या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवत २ लाख क्युसेक इतका केला आहे.
समन्वय ठेवून दोन्ही राज्यात पूर नियंत्रण केले जाईल, असे श्री. जारकीहोळी म्हणाल्याची माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिली.