कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:56 PM2020-08-17T13:56:14+5:302020-08-17T17:09:44+5:30

अलमट्टी पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी असून साठा १०९.७६ टि.एम.सि.आहे  १२७५८२ आवक असून  जावक २५०००० विसर्ग इतका आहे. 

Discharge of 2.5 lakh cusecs per second from Almatti | कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग

कर्नाटकचा शेजारधर्म; कोल्हापुरात पूर टाळण्यासाठी अलमट्टीमधून अडीच लाख क्युसेकने विसर्ग

Next
ठळक मुद्देअलमट्टीमधून प्रतिसेकंद अडीच लाख क्युसेक विसर्गअलमट्टी धरणातून आणखी २५ हजार क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि राधानगरीसह सर्वच धरणांतून वाढलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणातून आणखी २५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे. आता तो प्रतिसेकंद अडीच लाख क्यूसेक होत आहे.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी रविवारी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून विसर्ग वाढवला आहे. 

अलमट्टी पाणी पातळी सध्या  ५१८.८० मी असून साठा १०९.७६ टि.एम.सि.आहे  १२७५८२ आवक असून  जावक २५०००० विसर्ग इतका आहे. 

गतवर्षीसारखी पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या वर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची समन्वय समिती स्थापन केली आहे. दोन्ही राज्यांनी धरणांतील पाणी विसर्गाच्या नियोजनात समन्वय ठेवून पूर नियंत्रण करण्याचे ठरविले आहे.

राधानगरी धरणातून ७११२, कोयनेतून ५५९५८ तर अलमट्टी धरणातून २५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

Web Title: Discharge of 2.5 lakh cusecs per second from Almatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.