सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:27+5:302021-07-25T04:22:27+5:30
सांडव्यावरून ओसंडून वाहणारा तलाव पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची, हुल्लडबाज तरुणांची गर्दी सांडव्यानजीक होत असून पुलावर अस्ताव्यस्त लावण्यात आलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीची ...
सांडव्यावरून ओसंडून वाहणारा तलाव पाहण्यासाठी हौशी पर्यटकांची, हुल्लडबाज तरुणांची गर्दी सांडव्यानजीक होत असून पुलावर अस्ताव्यस्त लावण्यात आलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. एकंदरीत वाहतूक कोंडी आणि धोकादायक पूल यामुळे कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजू बंदिस्त करून वाहतुकीस बंदी घातली आहे. सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह पूर्ववत होताच प्रशासनाशी चर्चा करून वाहतुकीस पूल पूर्ववत करण्याचे सरपंच सागर भोगम यांनी मत व्यक्त केले आहे.
२४ कळंबा तलाव
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहत असल्याने नजीकचा पूल धोकादायक बनल्याने कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला आहे.