पाण्याचा विसर्ग वाढला, पाणीपातळी धोक्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:42+5:302021-07-23T04:15:42+5:30
गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग दीड फुटापेक्षा जास्त उंचीने सुरू होता. कळंबा ...
गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग दीड फुटापेक्षा जास्त उंचीने सुरू होता.
कळंबा तलावाचे मुख्य जलस्त्रोत असणारे कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले असून, त्याचा वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात सांडव्यानजीक अडकून पाणीप्रवाहात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लहान बंधाऱ्याचे सर्व बरगे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लहान सांडव्याचे सर्व बरगे काढण्यात आले. सांडव्यावरून दीड फुटाने मोठ्या वेगात पाणी निर्गतीकरण होत असून पाण्याचा वेग जास्त असल्याने सांडव्यानजीक नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
२२ कळंबा लेक
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ
कळंबा तलाव पूर्णक्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याने पालिका प्रशासनाने सांडव्यानजीकचे सर्व बरगे काढले.