काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:33+5:302021-07-28T04:24:33+5:30
: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने राधानगरी तालुक्यात रस्ते, शेती, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शिवाय या पावसाळ्यातील ...
: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने राधानगरी तालुक्यात रस्ते, शेती, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शिवाय या पावसाळ्यातील पहिले दोन बळी यात गेले; मात्र महसूल विभागाकडून अजून कोणत्याही प्रकारची पाहणी झालेली नाही. पंचायत समिती बांधकाम विभागाकडून रस्ते, साकव यांचे चार ठिकाणी मोठे नुकसान झाले असून, त्याच्या दुरुस्तीसाठी २९ लाख रुपये निधीची आवश्यकता व्यक्त केली आहे. कोनोलीपैकी कुपलेवाडी येथे झालेल्या दुर्घटनेतील पती-पत्नी व पाच ते सहा जनावरे दगावली येथील अन्य घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्ते शेजारील डोंगर खचून रस्ते बंद होण्याचे प्रकार २२ ठिकाणी घडले आहेत. अशा ठिकाणी तात्पुरती व्यवस्था केली असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. पडसाळी ते मकरवाडी यांना जोडणारा लोखंडी साकव वाहून गेला आहे.
तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी महसूल विभागाकडून उपलब्ध होत नाही; मात्र पाटबंधारे विभागाकडील नोंदीनुसार राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणाच्या परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण क्षेत्रात आज पर्यंत २८२0 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यापैकी चौदाशे मिलिमीटर पाऊस मागील सात दिवसात झाला आहे. असेच प्रमाण सर्वत्र आहे.
महापुराचा फटका भोगावती काटासह धामोड परिसराला जास्त बसला आहे. भोगावती तीरावरील कसबा तारळे, शिरगाव ते राशिवडे या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात व फुलशेतीचे जास्त नुकसान झाले आहे. शेतात असणाऱ्या घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
फोटो ओळ- तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने डोंगर खचून घरे, शेती व रस्ते यांचे मोठे नुकसान झाले आहे.