भाजी मंडईचे महापालिकेकडून शिस्तबद्ध नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:14+5:302021-06-03T04:17:14+5:30
कोल्हापूर : शहरातील भाजी मंडईत होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्यावतीने शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. सर्व मार्केटच्या मुख्य रस्त्यावर ...
कोल्हापूर : शहरातील भाजी मंडईत होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्यावतीने शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. सर्व मार्केटच्या मुख्य रस्त्यावर सोशल डिस्टन्स ठेवून पट्टे मारून भाजी विक्रेत्यांना बसविण्यात येत आहे. तसेच येथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राखले जात आहे.
विक्रेत्यांना भाजीविक्रीसाठी मुख्य रस्त्यावर बसविण्यात येत असून, त्याठिकाणी येणारे सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मार्केटमधील भाजी मंडई तूर्तास बंद केल्या आहेत. मार्केटमधील विक्रेत्यांना मुख्य रस्त्यावर सकाळी सात ते अकरा या कालावधीत गर्दी न करता नियमांचे पालन करून भाजीविक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेचे उपायुक्त व उपशहर अभियंता दर्जाचे अधिकारी रोज सकाळी सात वाजता फिरती करून मार्केटची तपासणी करत आहेत. भाजीविक्रेते, व्यापारी व नागरिकांनीही महापालिकेच्या नियोजनास सहकार्य करत आहेत.
शहरातील पंचगंगा घाट, लक्ष्मीपुरी, रिंगरोड, टिंबर मार्केट, नवीन वाशी नाका, नाना पाटीलनगर, ताराबाई रोड, अर्धा शिवाजी पुतळा, न्यू महाद्वाररोड, शिंगोशी मार्केट, बी. टी. कॉलेज रोड, धैर्यप्रसाद चौक, नार्वेकर मार्केट व इतर मार्केटमधील भाजीविक्रेत्यांना मुख्य रस्त्यावर नियोजन करून बसविण्यात आले आहे.