पालखी सोहळ्याला शिस्त लावणार-अध्यक्ष महेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:57 AM2017-09-17T00:57:26+5:302017-09-17T00:59:11+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता निघणाºया पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थानच्यावतीने नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता निघणाºया पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थानच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. याबाबतची बैठक शनिवारी समितीच्या कार्यालयात झाली. दरम्यान, करवीरनिवासिनी
श्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती महासरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवली होती. सायंकाळी सातनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अंबाबाईच्या मंदिराची स्वच्छता सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात शनिवारी देवीच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. सकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरले पांघरण्यात आले. या काळात भाविकांना देवीचे दर्शन मिळावे यासाठी उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली. दिवसभर स्वच्छता संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजा व अभिषेकानंतर देवीची मूर्ती दर्शनासाठी पूर्ववत खुली करण्यात आली.
नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी विविध आकारांत काढली जाते. या काळात भाविकांची संख्या जास्त असल्याने ढकलाढकली, धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. शिवाय स्वयंघोषित पाहुणे आणि कार्यकर्त्यांची संख्या खूप असते. यंदा मात्र या पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
याशिवाय मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन घटस्थापनेदिवशी सायंकाळी करण्यात येणार आहे.
उद्या पोलीस, पुजाºयांची बैठक
नवरात्रौत्सवाच्या नियोजनासाठी उद्या, सोमवारी पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण अशा विविध विभागांची बैठक सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात होणार आहे. दुपारी एक वाजता श्रीपूजकांनी नवरात्रौत्सवाचे केलेले नियोजन, देवीच्या विविध रूपांतील पूजा, पुजाºयांनी पाळावयाच्या सूचना यासंबंधीची बैठक होईल.
सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. या नऊ दिवसांत सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तब्बल ५१ संस्थांचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय भवानी मंडपातदेखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले असून, त्यासंबंधी संस्थांशी बोलणी झाली आहेत.