चिनी वस्तू नाकारा, राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:24 PM2017-10-04T14:24:51+5:302017-10-04T14:24:55+5:30
सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.
कोल्हापूर : सध्या भारत व चीनमध्ये तणावाची स्थिती असून, चीन विविध मार्गांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे, पाकपुरस्कृत दहशतवादास मदत केली जात आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य अतुल अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.
ते म्हणाले, चीनने १९६३ च्या युद्धात व त्यानंतरही भारताचा भूभाग बळकावला आहे. अनेकदा देशात घुसखोरी केली जात आहे. डोकलाम येथे चीनच्या लष्करी हालचालींमुळे भारताच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावरही चीनकडून भारताच्या विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आपल्याकडून दैनंदिन जीवनात चिनी वस्तूंच्या केल्या जाणाºया वापरामुळे अप्रत्यक्षपणे चीनच्या अर्थव्यवस्थेला हातभारच लावला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा व चीनच्या कारवायांबाबत जागरूक राहावे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
या अंतर्गत समाजातील विविध संस्था, मंडळे, महिला बचत गटांना अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. चीनच्या कारवायांची माहिती देणारी व स्वदेशी वस्तूंबाबतची पत्रके वाटली जाणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे; तसेच चिनी व विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेस जिल्हा कार्यवाह केदार जोशी, संयोजक केशव गावेकर, जिल्हा संयोजक अनिरुद्ध कोल्हापुरे उपस्थित होते.