मर्जीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने बाजार समितीत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:49+5:302021-03-19T04:23:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाच्या मर्जीतील कर्मचाऱ्याला पदोन्नती दिल्याने २० वर्षे काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशासकीय मंडळाच्या मर्जीतील कर्मचाऱ्याला पदोन्नती दिल्याने २० वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही पदोन्नती दिली आहे.
सहा महिन्यांपूर्वी बाजार समितीत माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अशासकीय मंडळ कार्यरत आहे. या मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. मात्र तीन वर्षापूर्वी अनुकंपा खाली रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याला शिपाई पदावरून थेट लिपिकपदी पदोन्नती दिली आहे. या कर्मचाऱ्याच्या अगाेदर १० ते २२ वर्षे शिपाई, वॉचमन म्हणून काम करणारे १३ कर्मचारी आहेत. त्यांना डावलून संबंधित कर्मचाऱ्याला पदोन्नती दिल्याने समिती प्रशासनामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
याबाबत, गुरुवारी पदोन्नतीस पात्र असणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांनी अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील व सचिव जयवंत पाटील यांची भेट घेतली.