वीज जोडणी तोडण्यास याला, तर ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:58+5:302021-02-08T04:21:58+5:30

कोल्हापूर : वीज बिल भरणार नाही कृती समितीने वीज बिल वसुलीबाबतच्या नोटिसांची रविवारी मिरजकर तिकटी येथे होळी केली. ...

To disconnect the power, let's show it as 'Kolhapuri Hiska' | वीज जोडणी तोडण्यास याला, तर ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू

वीज जोडणी तोडण्यास याला, तर ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू

Next

कोल्हापूर : वीज बिल भरणार नाही कृती समितीने वीज बिल वसुलीबाबतच्या नोटिसांची रविवारी मिरजकर तिकटी येथे होळी केली. त्याद्वारे समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी राज्य सरकार, महावितरण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध केला. वीज जोडणी तोडण्यास याल, तर कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा यावेळी कृती समितीने दिला.

वीज जोडणी तोडणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, आता वीज बिल भरा, नाही तर १५ दिवसात वीज पुरवठा खंडित करू, या आशयाच्या नोटिसा वीज ग्राहकांना पाठवून महावितरणकडून दडपशाही केली जात आहे. हा खोटारडेपणा आहे. कनेक्शन तोडल्यास आम्ही गप्प बसणार नाही. कोल्हापुरी हिसका दाखवू. टप्प्या-टप्प्याने लढा तीव्र केला जाईल, असे निवास साळोखे यांनी सांगितले.

कृती समिती जिल्ह्यातील एकही वीज जोडणी तोडू देणार नाही. कोल्हापूरमध्ये आंदोलनाचा वणवा पेटल्यास तो राज्यभर पसरेल, असा इशारा बाबा इंदुलकर यांनी दिला. नोटिसांना घाबरून कोणीही वीज बिल भरू नका. वीज कनेक्शन तोडण्यास महावितरणचा कर्मचारी आल्यास आपल्या परिसरातील तालीम, मंडळाची मुले, कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या साथीने त्याला परत पाठवून द्या, असे आवाहन बाबा पार्टे यांनी केले.

दरम्यान, लॉकडाऊनमधील सहा महिन्यांचे बिल माफ करावे. ऑक्टोबरपासूनचे बिल भरण्याची आमची तयारी आहे. नोटिसांना घाबरून कोणीही बिल भरू नका, असे आवाहन कृती समितीने केले. वीज बिल माफीची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन या समितीने केले.

यावेळी बाळासाहेब भोसले, अजित ठाणेकर, बाबासाहेब पाटील, जयकुमार शिंदे, फिरोजखान उस्ताद, राजू राऊत, महादेव पाटील, भारती जाधव, तेजस्विनी पार्टे, रजनी कदम, वनीता पार्टे, बीना देशमुख, राजू तोरस्कर, अशोक भंडारे, स्वप्निल पार्टे आदी सहभागी होते.

चौकट

...तर, साडी-चोळीचा आहेर करणार

वीज जोडणी करण्यास महावितरणाचा कर्मचारी आल्यास त्याला साडीचोळीचा आहेर केला जाईल, असा इशारा यावेळी राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी आदींनी दिला.

Web Title: To disconnect the power, let's show it as 'Kolhapuri Hiska'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.