Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:06 PM2022-06-21T17:06:30+5:302022-06-21T17:49:07+5:30

राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे.

Discussion of Goa tour of five former Shiv Sena MLAs in Kolhapur | Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

googlenewsNext

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचा झटका बसल्यानंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेला जबर धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही नॉट रिचेबल झाल्याने राज्यात खळबळ उडाली. राज्यात सर्वत्र नॉट रिचेबल'चे राजकीय वादळ उठलं असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच माजी आमदारांच्या गाेवा टूरची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीमधील अंतर्गत कलह उघड झाला. हा कलह शमते न शमते तोच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मंगळवारी सकाळीच शिवसेनेत खळबळ उडाली. त्यात जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर हे मंत्री शिंदे यांच्या सोबत राहिल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरु राहिली. तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, डॉ. सुजीत मिणचेकर व उल्हास पाटील या पाच माजी आमदारांच्या गोवा टूरची जोरदार चर्चा रंगली.

मुंबईत या घडामोडी सुरु असताना हे पाचजण गोव्याकडे का रवाना झाले. राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या गोव्याला जाण्याची चर्चा रंगली.

आमचे गोव्याला जाण्याचे पुर्वनियोजित होते. मुंबईतील घडामोडी आम्हाला प्रसार माध्यमातूनच समजल्या. त्यामुळे ज्या चर्चा सुरु आहेत, त्या निरर्थक आहेत. - चंद्रदीप नरके, माजी आमदार

Web Title: Discussion of Goa tour of five former Shiv Sena MLAs in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.