बजेटबाबत रेल्वे व बसस्थानकांवरील चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:59+5:302021-02-05T07:12:59+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढ होणार असे दिसून येत आहे. ही वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. ओघाने एस.टी.बसने प्रवासही ...

Discussion on railway and bus stations regarding budget | बजेटबाबत रेल्वे व बसस्थानकांवरील चर्चा

बजेटबाबत रेल्वे व बसस्थानकांवरील चर्चा

Next

केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल दरवाढ होणार असे दिसून येत आहे. ही वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. ओघाने एस.टी.बसने प्रवासही महागणार आहे. सर्वसामान्यांना व्यवसायानिमित्त प्रवास तर करावाच लागतो. त्यामुळे केंद्र शासनाने कृषी अधिभार म्हणून पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करणे चुकीचे आहे. हा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी चर्चा कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांवर सोमवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर व्यक्त झाली. आवाज कमी आणि खरखर जास्त असलेल्या स्थानकांवरील दुूरदर्शन संचावर मोडकंतोडकं बजेट ऐकलेल्या लोकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. या अर्थसंकल्पात सामान्य लोकांसाठी एकही चांगली बाब नसल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या गोपाळ माने यांनी व्यक्त केली.

फोटो : गोपाळ माने-एसटी

रेल्वेस्थानकावर प्रतीक्षा

रेल्वे बजेटच्या तरतुदी दोन दिवसांनंतर कळणार असल्याने कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह सर्वच घटक त्याबद्दल अनभिज्ञ होते. कोरोनामुळे आधीच लोकांची अर्थिक घडी बिघडली आहे. त्यात केंद्रीय अर्थसंकल्पातही सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही नाही. इंधन दरवाढ अटळ असल्याने रेल्वे प्रवासही महागणार आहे. सरकारने सोने-चांदी स्वस्त केले आणि पेट्रोल महाग होणार आहे. शेतीसाठी फारसे काही नाही. लोकांनी लॉकडाऊनमध्ये सोन्याचे दागिने गहण ठेवून कर्ज काढले ते देखील अजून फिटलेले नाही. त्यामुळे आता पोटाची भ्रांत असताना बजेटमध्ये काहीतरी दिलासा मिळेल असे वाटत होते; परंतु तिथेही भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने नागपूरला निघालेल्या मुरलीधर शामराव बारापते यांनी व्यक्त केली.

फोटो : मुरलीधर बारापते-रेल्वे

(दोन्ही फोटो आहेत)

Web Title: Discussion on railway and bus stations regarding budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.