शिरोळ तहसीलमधील त्या वाळूची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:50+5:302021-03-15T04:22:50+5:30
शिरोळ : शिरोळ महसूल विभागाने यापूर्वी कारवाई करून वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या परिसरात ...
शिरोळ : शिरोळ महसूल विभागाने यापूर्वी कारवाई करून वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली आहेत. मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या परिसरात वाळू असलेली काही वाहने लावण्यात आली आहेत. शनिवारी शासकीय सुट्टीचा फायदा घेत सांगली पासिंग असणाऱ्या एका वाहनातून वाळू भरून नेण्यात आली. वास्तविक जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्याचा कोणताही लिलाव नसताना वाळू नेण्यात आल्याने यामागे कोणाचा वरदहस्त याची चर्चा सुरू आहे.
गेल्या चार वर्षांपासून कृष्णेच्या पात्रातील वाळूचे साठे लिलावाअभावी बंद आहेत. हरित लवादाच्या निर्णयामुळे वाळू उपसा बंद असल्याने औरवाडसह परिसरात चोरुन वाळू काढण्यात आली होती, तर अन्य जिल्ह्यांतून परवाना नसताना वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करून अशी वाळू महसूल विभागाने जप्त केली होती. जप्त केलेल्या काही वाळूसाठ्याचा लिलावही करण्यात आला, तर वाळू भरलेली काही वाहने तहसील परिसरात आहेत. याचा फायदा घेऊन शनिवारी सांगली पासिंग असलेल्या एका वाहनातून सकाळच्या सत्रात तेथील वाळू भरून नेण्यात आली. सुट्टीच्या दिवशी नेण्यात आलेल्या या वाळूची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.