ग्रामआरोग्य दूत, आरोग्यवर्धिनी केंद्राबाबत जिल्हा परिषदेच्या कार्यशाळेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:00+5:302021-03-10T04:25:00+5:30
कोल्हापूर आरोग्य विभाग आणि गारगोटी येथील संवाद संस्था यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात सकाळी दहा वाजता या ...
कोल्हापूर आरोग्य विभाग आणि गारगोटी येथील संवाद संस्था यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात सकाळी दहा वाजता या कार्यशाळेस प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जिल्ह्यातील आरोग्यसेवांसाठी लोकाधारित कृती प्रक्रिया अंतर्गत जिल्हा पातळीवरील संसाधन गटाची तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या या कार्यशाळेमध्ये आरोग्यासाठी लोकाधारित कृती कार्यक्रम ओळख, या कार्यक्रम प्रक्रियेत स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका, जिल्हा सुकाणू संसाधन गट, ग्रामआरोग्य दूत, प्राथमिक आरोग्य केंद्र महासंघ, तालुका महासंघ, सामाजिक अंकेक्षण, जनसुनावणी या विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा हिवताप अधिकारी मोरे, लोकाधारित कृतीचे राज्य समन्वयक साथी संस्थेचे हेमराज पाटील आणि तृप्ती मालती, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे, जिल्हा समन्वयक व गारगोटीच्या संवाद संस्थेचे रवी देसाई, जिल्हा क्षेत्र समन्वयक योगेश सनदी, जिल्हा समन्वयक पल्लवी नकाते, हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, भुदरगडचे डॉ. एस. बी. यत्नाळकर, आजऱ्याचे डॉ. वाय. एस. सोनवणे, तालुका समूह संघटक, तालुका लेखापाल सहभागी झाले होते. पंकज कांबळे यांनी स्वागत केले तर काशीनाथ मोरे यांनी प्रास्तविक केले. तायाप्पा कांबळे, गीता चव्हाण यांनी आभार मानले.
---------------------------------------
फोटो : ०९०३२०२१-कोल-झेडपी हेल्थ वर्कशॉप
फोटो ओळी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी सहभागी झाले होते.
(संदीप आडनाईक)
===Photopath===
090321\09kol_2_09032021_5.jpg
===Caption===
09032021-Kol-zp health workshop जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी सहभागी झाले होते.