शहरात ८५ रिक्षा थांब्यांचे निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:52+5:302021-04-20T04:23:52+5:30
कोल्हापूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या व रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा ...
कोल्हापूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या व रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काळजी घेत प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने सोमवारी रिक्षा निर्जंतुकीकरण मोहीम राबिवण्यात आली.
या मोहिमेची सुरुवात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छत्रपती शाहू महाराज रिक्षा थांब्यावरून ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.
ही मोहीम रिक्षाचालक तसेच रिक्षातील प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत शहरातील सर्व ८५ रिक्षा थांब्यावर निर्जंतुकीकरण मोहीम राबविणार असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष लाला बिरजे, प्रकाश हरणे, बाबुराव बाजारी, विजय भोसले, महेश घोलपे, रामचंद्र गावडे, विशाल वाठारे, संजय सुर्यवंशी, मंगेश मोहिते, धनाजी देसाई, कृष्णा सूर्यवंशी तसेच आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, संघटक सूरज सुर्वे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - कोलडेस्कवर आप या नावाने टाकतोय, घ्यावा
ओळ - कोल्हापूर शहरातील रिक्षा निर्जंतुकीकरण मोहीम आपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून हाती घेतली, शहरातील ८५ रिक्षा थांब्यावर ही मोहीम राबविली जात आहे.