शासकीय रुग्णवाहिकेत व्हाईट आर्मीकडून निर्जंतुकीकरण स्प्रे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:17 PM2020-04-14T12:17:33+5:302020-04-14T12:19:11+5:30

कोल्हापूर : कोरोनाशी लढणाऱ्या विविध घटकांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूपासून संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्याठी इको अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू ...

Disinfection spray service from the White Army in the government ambulance | शासकीय रुग्णवाहिकेत व्हाईट आर्मीकडून निर्जंतुकीकरण स्प्रे सेवा

शासकीय रुग्णवाहिकेत व्हाईट आर्मीकडून निर्जंतुकीकरण स्प्रे सेवा

Next
ठळक मुद्देशासनाच्या १०८ रुग्णवाहिकेत या स्प्रेचा वापर केला जात आहे.

कोल्हापूर : कोरोनाशी लढणाऱ्या विविध घटकांना कोणत्याही प्रकारच्या विषाणूपासून संसर्ग होऊ नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्याठी इको अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, अ‍ॅस्टर आधारचे डॉ. अमोल कोडोलीकर, कस्तुरी रोकडे यांनी निर्जंतुकीकरण स्प्रे तयार करून त्याचा लाभ रुग्णवाहिकेसाठी करण्यात आला आहे.

रुग्णालय ते डॉक्टर आणि रुग्णवाहिकेतील कर्मचारी यांना ‘कोविड १९’ला सामोरे जावे लागत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी इको अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईट व हायड्रोजन पॅरॉक्साइड यांचे वेगवेगळ्या पाण्यात मिसळून स्प्रेद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचे टेक्निक विकसित करण्यात आले आहे. शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेत या स्प्रेचा वापर केला जात आहे.
 

 

Web Title: Disinfection spray service from the White Army in the government ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.