जयसिंगपूरमध्ये प्लास्टिकमुक्ती बेदखल-पालिकेच्या आदेशाला केराची टोपली :व्यापाºयांचा हरताळ, प्रशासनाची भीतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:31 AM2017-12-16T00:31:55+5:302017-12-16T00:32:25+5:30

जयसिंगपूर : प्लास्टिकमुक्त जयसिंगपूर करण्याच्या नगरपालिका प्रशासनाच्या संकल्पाला व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू

Dismantling of plastic emissions in Jaysinghpur: Kairachi basket in order to evict the corporation: Business, fear of administration and not fear of administration | जयसिंगपूरमध्ये प्लास्टिकमुक्ती बेदखल-पालिकेच्या आदेशाला केराची टोपली :व्यापाºयांचा हरताळ, प्रशासनाची भीतीच नाही

जयसिंगपूरमध्ये प्लास्टिकमुक्ती बेदखल-पालिकेच्या आदेशाला केराची टोपली :व्यापाºयांचा हरताळ, प्रशासनाची भीतीच नाही

Next

संदीब बावचे ।
जयसिंगपूर : प्लास्टिकमुक्त जयसिंगपूर करण्याच्या नगरपालिका प्रशासनाच्या संकल्पाला व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. यामीळे प्लास्टिकमुक्त जयसिंगपूर ही संकल्पना कागदावर राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, प्लास्टिकच्या बंदीसाठी पालिका प्रशासनाने मोहीम राबविण्याची गरज आहे.

पालिकेने १ डिसेंबर २०१७ पासून नगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कायद्याने बंदी आहे. मात्र, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यासाठी व शासनाच्या आदेशाप्रमाणे नोव्हेंबर २०१७ अखेरपर्यंत प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावावी, असे आवाहन पालिकेने केले होते.

पालिकेच्या हद्दीतील हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, मेडिकल, मच्छी, मटण विक्रेते, भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडी व्यावसायिक, पानपट्टीधारक यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यायाने कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा. या आवाहनानंतरही १ डिसेंबरपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेने दिला असतानाही प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे.

मटण व मच्छिमार्केट याठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. शिवाय काही हॉटेल विक्रेते, भाजीपाला विक्रेतेही प्लास्टिकमधून साहित्य ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना प्रशासनाची भीतीच राहिली नाही. तसेच प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. प्लास्टिकबंदी केवळ दिखावेगीरी करण्यासाठी असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

जयसिंगपूर पालिका प्रशासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पालिका शहरात जनजागृती करण्यात आलेली नाही. नागरिकांना प्लास्टिकला पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. प्लास्टिकबंदीचा प्रयोग शहरात फसल्याचे चित्र असलेतरी व्यापक जनजागृतीच पालिकेला आता करावी लागणार आहे.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी लोकसहभागाची गरज
पालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशवीला बंदी घातली आहे. विक्री करणाºयांवर कारवाई करू, असा इशारादेखील दिला आहे; पण प्लास्टिकमुक्त जयसिंगपूर ही नगरपालिकेची फक्त जबाबदारी नाही. या अभियानामध्ये नागरिकांनीदेखील सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने केला आहे.

 

शहरात प्लास्टिक पिशव्यांचा व्यापार करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी. शिवाय पिशव्यांचा साठा करणाºयांविरोधात मोहीम राबविण्याची गरज आहे. प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी कोठून येतात? यावरही कडक कारवाईची आवश्यकता आहे.
- सुरेश श्ािंगाडे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Dismantling of plastic emissions in Jaysinghpur: Kairachi basket in order to evict the corporation: Business, fear of administration and not fear of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.