लेेखी आदेशानंतर घरातील बाधितांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:03+5:302021-05-27T04:26:03+5:30

कोल्हापूर : सरकारकडून लेखी आदेश मिळाल्यानंतर घरात राहून उपचार घेणाऱ्या शहरातील कोरोना बाधितांना कोविड काळजी केंद्रात स्थलांतर करण्यात येणार ...

Displacement of affected persons after written order | लेेखी आदेशानंतर घरातील बाधितांचे स्थलांतर

लेेखी आदेशानंतर घरातील बाधितांचे स्थलांतर

Next

कोल्हापूर : सरकारकडून लेखी आदेश मिळाल्यानंतर घरात राहून उपचार घेणाऱ्या शहरातील कोरोना बाधितांना कोविड काळजी केंद्रात स्थलांतर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. आता सुरू असलेल्या १५ केंद्रातील बेड फुल्ल झाल्यानंतर शिल्लक असलेल्या बाधितांसाठी चार ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

शहरात २ हजार १४ बाधित घरात राहून उपचार घेतात. पण घरात राहून उपचार घेताना कुटुंबीयातील इतर सदस्यांशी संपर्क येऊन कोरोनाचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. म्हणून होम क्वारंटाईनऐवजी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यावरच भर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण अजून यासंबंधीच्या मार्गदर्शनपर सूचना महापालिका प्रशासनास प्राप्त झालेल्या नाहीत. आदेश मिळाल्यानंतर घरात असलेल्या बाधितांचे स्थलांतर सध्याच्या कोरोना काळजी केंद्रात करण्यात येणार आहे. स्थलांतर करताना जे बाधित स्वतंत्र घरात राहतात, बाधितांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शौचालयाची व्यवस्था आहे, त्यांचे स्थलांतर करण्यात येणार नाही. ज्यांच्याकडे अशा सुविधा नाहीत, त्यांना सक्तीने कोरोना काळजी केंद्रात हलवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी केंद्रे वाढवण्याची तयारीही करण्यात आली आहे.

कोट

सध्या सुरू असलेल्या केंद्रात ३६७ बेड शिल्लक आहेत. हे बेड फुल्ल झाल्यानंतर लक्षतीर्थ, दुधाळी, हॉकी स्टेडियम समोरील इमारत, अंडी उबवणी केंद्रात कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यात येईल.

रविकांत आडसूळ, उपायुक्त, महापालिका

Web Title: Displacement of affected persons after written order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.