तलवारीचा धाक दाखवून प्रापंचिक साहित्याची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 08:50 PM2020-01-10T20:50:59+5:302020-01-10T20:52:18+5:30
लक्षतीर्थ वसाहत दुर्गामाता मंदिराजवळ किरकोळ वादातून घरात घुसून तलवारीचा धाक दाखवून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. संशयित विकास ऊर्फ चिक्या बंडोपंत भिऊंगडे (वय २९), रोहन बंडोपंत भिऊंगडे (३१), केदार भागोजी गुरखे (२३, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत दुर्गामाता मंदिराजवळ किरकोळ वादातून घरात घुसून तलवारीचा धाक दाखवून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. संशयित विकास ऊर्फ चिक्या बंडोपंत भिऊंगडे (वय २९), रोहन बंडोपंत भिऊंगडे (३१), केदार भागोजी गुरखे (२३, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सुनील शंकरराव मंडलिक (६०) हे घरी असताना ८ जानेवारीला घरासमोर तरुणांच्यात वादावादी झाली. यावेळी मंडलिक मध्यस्थी करण्यासाठी गेले असता संशयितांना राग आला. त्यांनी वाद मिटल्यानंतर त्यांचे घरी घुसून तलवारीचा धाक दाखवून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली.
त्यामध्ये फुलदाणी, टेबल, झाडाची कुंडी, खिडक्यांचा काचा, आदींचे नुकसान केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल गुजर तपास करीत आहेत.