इचलकरंजी पालिकेत अधिकारी व नगरसेविका यांच्यात वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:38+5:302021-06-03T04:18:38+5:30
नगरसेविका जुलेखा पटेकरी यांनी नगरपालिकेकडे जवाहरनगर भागातील अतिक्रमणासंबंधी तक्रार केली आहे. सदर अतिक्रमणाबाबत जुलेखा यांच्यासह त्यांचे पती जहॉँगीर पटेकरी ...
नगरसेविका जुलेखा पटेकरी यांनी नगरपालिकेकडे जवाहरनगर भागातील अतिक्रमणासंबंधी तक्रार केली आहे. सदर अतिक्रमणाबाबत जुलेखा यांच्यासह त्यांचे पती जहॉँगीर पटेकरी यांनी नगररचना विभागात केलेल्या तक्रारीबाबत वारंवार विचारणा करूनही प्रभारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे पटेकरी दाम्पत्य प्रभारी नगररचनाकार कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली. यावेळी कुलकर्णी यांनी अतिक्रमण विभाग स्वतंत्र असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेविका पटेकरी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही विभागातील अधिकारी हा विषय आपल्याकडे असल्याचे कसे काय सांगत आहेत, असा जाब विचारला. त्यातून शाब्दिक वाद वाढल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे नगररचनाकार आणि पटेकरी दाम्पत्य मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या कार्यालयात पोहोचले. मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजून घेत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याचे वर्तन ठेवावे, असे सांगून वादावर पडदा टाकला.