प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:59+5:302021-07-16T04:17:59+5:30
पट्टणकोडोली येथे कोरोनाबाधितांची संख्या ५००वर झाली आहे. ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमधून अनेक रुग्णांवर उपचार करून घरी पाठविले आहे. गावातील ...
पट्टणकोडोली येथे कोरोनाबाधितांची संख्या ५००वर झाली आहे. ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमधून अनेक रुग्णांवर उपचार करून घरी पाठविले आहे. गावातील रुग्ण संख्याही घटत आहे. मात्र राज्य शासनामार्फत कोरोना रुग्णांचा सर्व्हे करण्यासाठी एक समिती गावाला भेट देणार आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या आदेशावरून गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे काम आज ग्रामपंचायतीचे घेतले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रुग्ण बरा झाल्यावर ग्रामपंचायतीकडून त्याचे घर प्रतिबंधित करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतीत ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविल्याचे सांगितले. मात्र या ग्रामविकास अधिकारी यांनी साधी आयसोलेशनला सेंटरला कधीही भेट दिली नाही. मात्र राज्यस्तरीय समिती भेट देण्यास येणार यावरून ग्रामसेवक तत्पर होऊन प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावत असल्याने ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता.हातकणंगले)येथे राज्यस्तरीय समिती भेट देण्यास येणार आहे हे कळल्यावर ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून प्रतिबंधित क्षेत्र असा डिजिटल फलक रुग्णांच्या दारी लावला जात आहे.