पाटपन्हाळा स्मशानशेड रस्त्याचा वाद मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:25+5:302021-07-10T04:17:25+5:30
बाजार भोगाव : शेतकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सात फूट रुंदीचा रस्ता करण्यास मान्यता दिल्याने पाटपन्हाळा येथील स्मशानशेड ...
बाजार भोगाव : शेतकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सात फूट रुंदीचा रस्ता करण्यास मान्यता दिल्याने पाटपन्हाळा येथील स्मशानशेड रस्त्याच्या वाद मिटला. प्रशासनाने शेतकरी व ग्रामपंचायत यांच्यात समेट घडवून सकारात्मक निर्णय घेतला आहे. रस्त्याचा वाद मिटल्याने ग्रामस्थांतून समाधानाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
पाटपन्हाळा येथील कासारी नदीकाठी असलेल्या स्मशानशेड रस्त्याचा वाद गेले काही दिवस सुरू होता. सार्वजनिक खात्याने संपादित केलेली जमीन त्यावरील पिकाचे अतिक्रमण काढण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याला शेतकऱ्यांचा झालेला विरोध, स्मशानशेड वादावरून झालेले आरोप प्रत्यारोप यामुळे स्मशानशेड वादाचा विषय ऐरणीवर आला होता. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन वादावर पडदा टाकून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती. बुधवारी तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी बाजीराव पाटील , सरपंच संदीप पाटील , पंतप्रधान सडकचे अधिकारी गायकवाड , सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंता सरिता देशपांडे, बाजार भोगावचे मंडलाधिकारी बी . एस. खोत . आदींची बैठक झाली. सर्वांच्या उपस्थितीत स्मशानशेड जवळील सात फुट रुंदीचा रस्ता करण्यासाठी ऊस पीक काढून जागा मोकळी करण्यात आली.
फोटोओळ
पाटपन्हाळा - स्मशान शेड रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पीक काढून जागा मोकळी करण्यात आली .