इचलकरंजी नगरपालिकेतील बैठकीत वाद पोहचला शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:43+5:302021-07-07T04:29:43+5:30

सनियंत्रण समितीची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने उघडण्यासंदर्भात नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या दालनात ...

The dispute reached Shigala in the meeting of Ichalkaranji Municipality | इचलकरंजी नगरपालिकेतील बैठकीत वाद पोहचला शिगेला

इचलकरंजी नगरपालिकेतील बैठकीत वाद पोहचला शिगेला

Next

सनियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने उघडण्यासंदर्भात नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या दालनात खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व 'इनाम'चे अभिजित पटवा यांच्यात जोरदार वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. याची माहिती मिळताच पोवार समर्थक व भाजप कार्यकर्ते पालिकेत दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पटवा यांना दालनातून बाहेर काढले. या प्रकारामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शहरातील व्यापा-यांनी ९० दिवसांहून अधिक काळ आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले. मात्र, व्यापाºयांची सहनशीलता संपल्याने त्यांनी सोमवारी आपली दुकाने उघडली. दरम्यान, यासंदर्भात नगरपालिकेच्या सभागृहात खासदार माने यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. त्यानंतर निर्णय जाहीर करण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात सर्वजण जमले.

यावेळी उपनगराध्यक्ष पोवार व इनामचे पटवा यांच्यात जोरदार वादावादी होऊन शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यानंतर तत्काळ पोलीस दाखल झाले व त्यांनी हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या वादाची माहिती बाहेर समजताच उपनगराध्यक्ष पोवार समर्थक व इनामचे कार्यकर्ते जमले. यामुळे पालिकेत वातावरण तंग बनले. इनाम विरुद्ध पवार समर्थक असा वाद सुरू झाला. उपस्थित काही काहीजणांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला तरी सुमारे तासभर तणावाचे वातावरण होते. या घटनेची शहरात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. बैठकीस मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, तहसीलदार शरद पाटील, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, मदन झोरे, सागर चाळके, सुनील पाटील, मदन कारंडे, शशांक बावचकर, रवींद्र माने यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

काही वेळातच पुन्हा दुकाने बंद

शहरातील व्यापा-यांनी निर्णयानुसार सकाळी दहा वाजता दुकाने उघडली. मात्र, पालिकेत बैठकीमध्ये गोंधळ झाल्याची बातमी व्यापा-यांना समजली. तसेच पोलीस गाड्या फिरत असल्याने व्यापा-यांनी आपली दुकाने बंद केली. यावेळी व्यापा-यांची मोठी धावपळ उडाली.

..........

कायदेशीर मार्ग काढू

शहरातील कोरोना पॉझिटिव्हचा दर लक्षात घेवून इचलकरंजी पालिकेने दुकाने उघडण्याबाबत राज्य शासनाकडे स्वतंत्रपणे प्रस्ताव पाठविण्याची गरज होती. परंतु तो प्रस्ताव पाठविला गेला नाही. कोल्हापूर महापालिकेने प्रस्ताव पाठविल्यामुळे तेथे दुकान उघडण्यास परवानगी मिळाली. आता इचलकरंजी नगरपालिकेनेही तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. बुधवारी (दि.७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दिलासादायक कायदेशीर मार्ग काढू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीत दिले.

...........

इचलकरंजी जिल्ह्याबाहेर आहे का?

कोल्हापूर शहरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असून इचलकरंजीस डावलले असल्याची माहिती समजताच सोशल मीडियावर इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्याबाहेर आहे का, यासह स्थानिक नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांवर तीव्र नाराजी व्यक्त करणारे मेसेज धुमाकूळ घालत होते.

फोटो ओळी

०५०७२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत दुकाने सुरू करण्यासंदर्भात नगरपालिकेत बैठक झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे, रवींद्र माने, सागर चाळके, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.

छाया-छोटूसिंग

Web Title: The dispute reached Shigala in the meeting of Ichalkaranji Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.