मरणानंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना

By admin | Published: September 22, 2014 11:22 PM2014-09-22T23:22:03+5:302014-09-23T00:10:17+5:30

पट्टणकोडोलीत प्रकार : अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा भाग कुत्र्यांकडून पळविण्याचा प्रकार

Disregard their luck even after death | मरणानंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना

मरणानंतरही त्यांच्या नशिबी अवहेलना

Next

पट्टणकोडोली : जीवन संघर्ष करून काहींना मरणानंतरही सरणावर उपेक्षाच वाटयाला येत आहे. पट्टणकोडोली स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांकडून पळवून नेऊन आजूबाजूच्या शेतात टाकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मृतदेहांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीभोवती संरक्षक भिंत बांधण्याची मागणी जोर धरत आहे.
पट्टणकोडोली येथे साडेचार एकर क्षेत्रामध्ये स्मशानभूमी उभारली आहे. मृत्यूनंतर रितीरिवाजाप्रमाणे मृतदेहांचे दहन करून येथे अंत्यसंस्कार केले जातात. तालुका पंचायत व जिल्हा परिषदेच्या निधीतून स्मशानभूमीमध्ये दोन मोठे स्मशानशेड बांधले आहेत. या ठिकाणी स्मशानशेडच्या कठड्यावरच मृतदेहांचे दहन केले जायचे. मृतदेह पूर्ण दहन झाल्यानंतरच मृताचे संबंधित लोक घरी परतायचे. सध्या स्मशानशेडमध्ये दोन शवदाहिन्या बसविल्या असून, मृतदेहाचे यावर दहन केले जाते. शवदाहिन्यांमुळे कमी वेळेत व कमी लाकडांमध्ये दहन पूर्ण होते, असा अंदाज केला जात असल्याने मृताचे संबंधित दहन करण्यासाठी आलेले लगेचच घरी परतत आहेत. आजारी माणसाच्या मृतदेहाचे दहन होण्यास विलंब लागतो. तसेच रात्रीच्यावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना मृताचे संबंधित लोक शक्यतो थांबत नाहीत. परिणामी, असे अर्धवट मृतदेह जळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील भटकी कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे काही भाग पळवून नेऊन शेतात टाकत आहेत. त्यामुळे शेतात शेतकऱ्यांवर या टोळ््यांकडून हल्लाही करण्याचे प्रकार घडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)

स्मशाभूमीचे क्षेत्र साडेचार एकर आहे. यामध्ये अनेकांनी अतिक्रमणेही केली आहेत. या स्मशानभूमीकडे ग्रामपंचायतीकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांची कुत्र्यांकडून हेळसांड होत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

Web Title: Disregard their luck even after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.