दत्तवाडमध्ये अधिकारीच न आल्याने सदस्य, ग्रामस्थांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:34+5:302021-02-06T04:42:34+5:30

दत्तवाड : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्यालय सील करून दोन दिवस झाले तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन दखल न ...

Dissatisfaction from members and villagers as no officer came to Dattawad | दत्तवाडमध्ये अधिकारीच न आल्याने सदस्य, ग्रामस्थांमधून नाराजी

दत्तवाडमध्ये अधिकारीच न आल्याने सदस्य, ग्रामस्थांमधून नाराजी

Next

दत्तवाड : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे कार्यालय सील करून दोन दिवस झाले तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन दखल न घेतल्याने नागरिकांसह सदस्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.

सोमवारी नूतन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन दोन महिन्यांचे हिशेब तपासणी केली असता अनेक वस्तूंच्या खरेदीमध्ये तफावत आढळली. बल्ब व होल्डर दत्तवाड येथे स्वस्त मिळत असताना कोल्हापूर येथून जास्त दराने खरेदी केल्याचे आढळून आले आहे तर खुर्च्या खरेदीसाठी तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील एका फर्निचरचे बिल अदा केले असून खुर्च्या ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या नाहीत. याबाबत जीएसटीचे बिल कोल्हापूर येथे घेऊन खरेदी अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील सुताराकडून खुर्च्या बनवून घेणार असल्याचे निदर्शनास आले. वस्तू न देता जीएसटीचे बिल देणारा हा व्यापारी कोण याची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बिलाची रक्कम व त्यास दिलेल्या रकमेत तफावत आढळत आहे. पाणीपुरवठा गळतीमध्ये देखील बँकेतून काढलेली रक्कम व दिलेली रक्कम मध्ये तफावत आहे. वाहतुकीमध्ये व फॉगिंग मशीन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. दोन महिन्यांच्या तपासणीमध्ये पन्नास हजार रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून याबाबत गटविकास अधिकारी शंकर कवितके, विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे यांच्याकडे तक्रार केली. तथापि मंगळवारी ग्रामपंचायत बैठक घेण्याचे ठरले होते मात्र कोणतेही अधिकारी दत्तवाडला फिरकले नाहीत. त्यामुळे सदस्य व नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Dissatisfaction from members and villagers as no officer came to Dattawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.