अभिवाचन उपक्रमातून विविध साहित्यकृतींचे प्रसारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:40+5:302021-02-27T04:31:40+5:30
इचलकरंजी : शहरात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी 'पुस्तकाच्या पानोपानी' हा अभिवाचन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपक्रमाच्या दुसºऱ्या शृंखलेत मराठी ...
इचलकरंजी : शहरात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी 'पुस्तकाच्या पानोपानी' हा अभिवाचन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपक्रमाच्या दुसºऱ्या शृंखलेत मराठी साहित्यामधील प्रसिद्ध कथाकार आणि कवी यांच्या विविध प्रकारच्या कथा आणि कविता सादर करण्यात आल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आणि मनोरंजन मंडळ यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष श्रीकांत फाटक, वैशाली नायकवडे, समीर गवंडे, संजयसिंह गायकवाड यांची आहे. चित्रीकरण व संकलन सर्वेश होगाडे यांनी केले. मनोरंजन मंडळ, इचलकरंजी या यू ट्युब चॅनेलवरून या उपक्रमाचे ऑनलाईन दर मंगळवारी करण्यात येत आहे. त्यास रसिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.