जि. प. दत्तवाड व दानोळी पं. स. निवडणूक मार्चमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:36+5:302021-02-08T04:20:36+5:30

शिरोळ : तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समिती रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर ...

Dist. W. Dattawad and Danoli Pt. C. Election in March | जि. प. दत्तवाड व दानोळी पं. स. निवडणूक मार्चमध्ये

जि. प. दत्तवाड व दानोळी पं. स. निवडणूक मार्चमध्ये

Next

शिरोळ : तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समिती रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मार्च महिन्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

दत्तवाड जि. प. सदस्य प्रवीण माने व दानोळी पंचायत समितीचे सदस्य सुरेश कांबळे यांच्या निधनाने या दोन्ही जागा रिक्त आहेत. माने हे काँग्रेसचे, तर कांबळे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य होते. या दोन्ही जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील वर्षी जि. प. व पं. स. च्या अधिकृत निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीची रंगीत तालीम पहायला मिळणार असून, मतदार यादीच्या कार्यक्रमानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर १० मार्चला मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या दोन्ही जागेच्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Dist. W. Dattawad and Danoli Pt. C. Election in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.